Breaking News

खान्देशातील खर्ची येथील सिध्द चंद्रवट सप्तशृंगीचे माहेर...

खान्देशातील खर्ची येथील सिध्द चंद्रवट सप्तशृंगीचे माहेर... 

नितिन पाटिल- एरोंडोल 
लोक बातमीदार न्युज नेटवर्क
एरोंडोल प्रतिनिधी-=:
खान्देशातील जळगाव जिल्ह्य़ातील एरंडोल तालुक्यातील खर्ची हे गाव हजारो वर्षे पूर्वीपासुन लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तश्रुंगी देवीचे माहेर आहे. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या गावाजवळच सप्तश्रुंगी देवीचे मंदिर आहे. हे मंदिर अत्यंत प्राचीन काळापासून ते आहे. त्याठिकाणी आता भव्य अशी मंदिराची वास्तु उभी राहिली आहे. याबाबतचा हा खास रिपोर्ट.... 
खानदेशाचे महत्व भाग्य पाचवा वट ज्याचे नाव वेद पुरानी सिद्ध चंद्रवट या नावाने या वडाचे स्थान महात्म्य औरव महामुनी यांनी याच वडाखाली घोर तप साधना करुन त्याच वडामध्ये शिवपार्वतीचा एक कल्प वास त्याच पुण्य स्थळी वज्रेश्वरीचा जन्म  तिचे तप महिषासुराचे वैर तेथेच तपोभंग केला. म्हणून माता पार्वतीने त्याचं पुण्य स्थळी सिंह रूढ अष्टभुजा अवतार घेतला म्हणून तेथे मल युद्ध झाले. त्या महिषाचे दक्षिणेकडे पलायन झाले. महिषाचा वध ते म्हसावद, धड उडाले ते म्हसवे, शिर फेकले ते शिरागड, ब्रम्हदेवाचा वरदान मनी देहातून जिथे पडला तिथे स्वयंभू मनुदेवी, यानंतर गडाकडे पलायन पायातील पद्मा पडले ते पद्मालय, पाट पाटल्या फेकले ते पाटना देवी स्थान, नस्तंन मावळला ते नस्तंनपुर, दहा अश्रू ढाळले ते दाक्षायणी लासुर, वैजंती माळ तुटून पडली ते वैजापूर, दंडकारण्यामध्ये ठिक ठिकाणी असुरांचा वध करत सातवे शृंगी आरुड स्थापना  म्हणून सप्तशृंगीचे माहेर सिद्ध चंद्रवट तीर्थ आहे.याच पुण्य स्थळी अष्ट भैरवांचे तप याच पुण्य स्थळी शिव अवतारी गोरक्षनाथांचे तप व वरदान.
     *सप्तश्रृंगीचे माहेर खान्देश कसे?*
*महात्म्य- पुढिल प्रमाणे.*
सप्तश्रृंगीचे माहेर त्याचे नाव सिध्द चंद्रवट आहे. सप्तश्रृंगीच्या या माहेराला सिध्द चंद्रवट हे नाव का पडले ? तर या भूमीवर ‌‘आर्व' नावाचे महामुनी याच ठिकाणी वट वृक्षाखाली तप करीत होते. हजारो वर्षे तप केले मग तो वड त्या तपाच्या योगाने सिध्द झाला . शिव-पार्वती आले प्रसन्न झाले, काय मागायचे मागा त्याने युक्तिने असे मागून घेतल की भगवान आपण या ठिकाणी आकल्प वास करावा, भगवान शिव-पार्वतींनी त्यांना आशीर्वाद दिला की ठिक आहे आम्ही या वटवृक्षामध्ये आकल्प वास करू म्हणून हा वड सिध्द वट या नावाने वेद पुराणांमध्ये जाहीर आहे.  याच ठिकाणी चंद्राने तप केले, चंद्र दोषमुक्त झाला आणि भगवान शिवांनी चंद्राला दोन वरदान दिले. तु दोषमुक्त होणार आणि त्या निमित्ताने एक ज्योतिर्लिंग तयार होईल ते सैराष्टे सोमनाथचं हे ज्योतिर्लिंग निर्माण झाले. त्याने तिसरा वर‌ मागितला, की या तूमच्या शिव-पार्वती आकल्प वास या‌ शुध्दभुमीत तप केला तर आपण मला वरदान द्या, या जागेमध्ये या वडाला माझं नाव द्यावे. अगोदरचा सिध्दवट त्या वडाला वरदान दिले म्हणून सिध्द चंद्रवट हे नाव ह्या भुमीला शंकरांनी वरदानीत केले. या ठिकाणी अष्टभैरवांनी येवून तप केले.पुत्रप्राप्तीसाठी तप करीत असताना शिव प्रसन्न झाले, भगवान म्हणाले, ह्या जन्मात तुम्हाला संतती नाही पण या तप पुण्याने मी‌ तुम्हाला प्रसाद देतो मग त्यांनी प्रसाद दिला तो असा समोरच्या डोहामध्ये स्नान करायला सांगितले आणि डोहातुन कन्या निर्माण केली. अष्टभैरवांनी पाहिले त्यांच्या पत्नीने जोगेश्वरीने पाहिले त्या कन्याला उचलल भगवान शंकरापुढे ठेवले. भगवान शंकरांनी सांगितले, मी म्हणालो होतो ना ह्या जन्मात तुम्हाला संतती नाही, पण मी प्रसाद देतो हा घ्या, सांभाळा, लहानची मोठी करा तिची त्रिभूवनात किर्ती होईल आणि ही त्रिभुवनाचा भार कमी करण्यासाठी हिची योजना होईल. तिच नाव त्यांनी वैजांगी ठेवले. नंतर ती वयात आली तिने घराचा त्याग केला तप करण्यासाठी माग्रस्त झाली. त्यावेळेस  अष्टभैरवांनी तिला सांगितले कुठे तरी जाण्यापेक्षा तू ज्याठिकाणी तुझा जन्म झाला त्याठिकाणी जा मग तिथून सिध्द चंद्रवट ठिकाणी ती कन्या आली तिने घोर तप केला. भगवान शिव प्रसन्न झाले.भगवान शिवानी तिला वर माग म्हटले,  तिने तिन वर मागितले. याठिकाणी शक्ति अवतार व्हावा, देवांनी माझ्याकडे मंत्रविद्या मागावी, मागितल्या नंतर मी लगेच देईल आणि त्यांची दहा पट शक्ति वाढेल असे वरदान द्या शंकरांनी वरदान दिले व तिला वज्रेश्वरी हे नाव दिले.अष्टभैरवांनी त्या कन्याला व्रजांगी नाव ठेवले होते पण ह्याच सिध्द चंद्रवट तिर्थी तिचे नाव वज्रेश्वरी ठेवले म्हणून सिध्द चंद्रवट तिर्थी हा चौथा महिमा वज्रेश्वरी चा जन्म सिध्द चंद्रवट तिर्थी झाला. ती कन्या त्या ठिकाणी तप करीत असताना तिन जन्माच म्हैसाच वैर म्हणून तो तपभंग करू लागला तो तपभंग करीत असतांना भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितले की उडव त्याच शिर म्हणून याच पुण्यस्थळी माता पार्वतीने सिंहावृढ अष्टभुजा अवतार घेतला म्हणजे आवेश अवतार घेतला म्हणून ही जागा सिध्द चंद्रवट तिर्थ सप्तश्रृंगीच माहेर ठरलं. नंतर आठव माहात्म्य ह्या जागेच विशेष आहे. आपल्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वर महाराज म्हणून नाथ संप्रदायाचे थोर संत होऊन गेले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे नाथ संप्रदायाचे महान अवतरीत योगी पुरुष होऊन गेले. आख्यायिका आहे  लोक सांगतात कथा किर्तनात ऐकायला मिळते कि त्यांची कुलस्वामिनी सप्तश्रृंगी आहे तर सप्तश्रृंगी कशी तर मुळ इतिहास असा आहे. योगी गोरक्षनाथ गो रक्षेतुन बाहेर काढले मच्छिंद्रनाथांनी त्यांना हिमालयाकडे निले व तिथे घोर तप करून घेतल भगवान शंकरांनच त्यांना दर्शन करून दिलं आणि त्यानंतर आशीर्वाद दिला की जा येथून पुढे सिध्द मार्गातून नाथ संप्रदायाचे प्रचार प्रसार करा महिमा वाढवावी म्हणून गोरक्षनाथ शिष्यांनसोबत दक्षिणेकडे आले अनेक तिर्थक्षेत्र साधुसंतांना भेट देत असताना एका नगरीत आले त्याठिकाणी त्या नगरीत एक बाल योगी त्यांच तप सामर्थ्य पाहून गोरक्षनाथांना अस वाटलं की हा चमत्कारी बालक आपला शिष्य व्हावा म्हणून प्रयत्न केले पण शिष्याने नकार दिला मी दत्तांचा अनुग्रह घेतला आहे मी तुमचा शिष्य होऊ शकत नाही त्या ठिकाणी ते आपल्या सामर्थ्यामध्ये कमी पडले याची त्यांना खंत वाटली त्यानंतर रात्री झोपल्यानंतर भगवान शंकरांनी आणि मच्छिंद्रनाथांनी त्यांना द्रुष्टांत दिला की तुम्ही महाराष्ट्रात खान्देशातील सिध्द चंद्रवट तिर्थी जावून घोर तप करा म्हणून गोरक्षनाथ सिध्द चंद्रवट तिर्थी आले व त्यांनी घोर तप केले. तप पुर्ण झाल्यावर भगवान शंकरांनी मच्छिंद्रनाथास सांगितलें तुमचा शिष्य तपोपुर्तीमध्ये पारंगत झाला आहे त्याची परिक्षा घ्यावी म्हणून यानिमित्ताने मच्छिंद्रनाथ या ठिकाणी आले त्यांनी सिंहांचा रूप धारण केले आणि नंतर गोरक्षनाथांन समोर आले आवाज काढले डरकारी फोडली तरी गोरक्षनाथांनचा तप भंग झाला नाही ते परिक्षेत उत्तीर्ण झाले मच्छिंद्रनाथास आनंद वाटताच तेथे शिव प्रकट झाले. भगवान शंकरांनी सांगितले तुम्ही दोघे माझे अंश अवतार असल्यामुळे मी आपल्याला आशिर्वाद देतो तुम्हा दोघांच्या निमित्ताने नाथ संप्रदायाचा प्रसार प्रचार व्हावा दुसरा आशीर्वाद दिला तुमचा नाथ संप्रदाय सिद्दीचा सागर बनो तेव्हढ्यात माता पार्वती प्रकट झाल्या म्हणाल्या की तिसरा वर‌ मी देते व त्यांनी ह्या च सिध्द चंद्रवट तिर्थी म्हणजे सप्तश्रृंगीच्या माहेरी गोरक्षनाथांना आणि मच्छिंद्रनाथांना आशीर्वाद दिला की तुमच्या निमित्ताने तुमचे ८४ शिष्य योगी निर्माण होतील व त्यावेळी एका कार्यच्या निमित्ताने मी आवेश अवताराची वाटचाल करील. ८४ शिष्य पुर्ण झाल्यावर त्यांनी याग ठरवला तो याग निफाड तालुक्यातील लोणशाही डोंगर नावाचे उंच शिखर आहे त्याठिकाणी त्यांनी याग केला. म्हैसाचा वध करून ज्यावेळी आदिमाया सप्तश्रृंगी गडाकडे जात असताना झुंबर खाली टाकल पुर्णाहूतीचा काळ व ते झुंबर खाली पडल्यावर त्यातून आदिशक्ती प्रकट झाली माता पार्वतीने वचन दिल्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी सिध्द कुंजिका नावाचा बिज मंत्र दिला यावरून  नाथ संप्रदायाची कुलस्वामिनी सप्तश्रृंगी आहे.अशी या सप्तश्रृंगीच्या माहेरची एक एक महिती अलौकिक आहे.
अशी माहिती श्री क्षेत्र चंद्रवट तीर्थ हे सिद्ध चंद्रवट तीर्थ श्री क्षेत्र खर्ची ओम नर्मदेश्वर शिव ट्रस्ट श्री क्षेत्र खर्ची ता. एरंडोल, जि. जळगाव चे महामंडलेश्वर स्वामी माधवानंन्द सरस्वती यांनी माहिती दिली त्यांच्या शी संपर्क साठी मो. नं. ८३२९६४५०३३ या नंबरवर संपर्क साधला असे आवाहन केले आहे


*बाईट* महामंडलेश्वर स्वामी माधवानंन्द सरस्वती
खर्ची ता. पाचोरा जिल्हा जळगाव

No comments