Breaking News

वंचित बहुजन आघाडी या पक्षाची वाघोदा बुद्रुक येथे बैठक संपन्न


लोक बातमीदार न्युज नेटवर्क 
रावेर प्रतिनिधी:- रावेर तालुका वंचित बहुजन आघाडी या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक वाघोदा बुद्रुक येथील बुद्ध नगरीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.

या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, जिल्हा संघटक शेख याकूब शेख नजीर , रावेर तालुका उपाध्यक्ष सलीम शहा, कैलास तायडे हे उपस्थित होते
या बैठकीला मार्गदर्शन करताना वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी मार्गदर्शन करताना उपस्थितांना वंचित बहुजन आघाडी या पक्षाची संपूर्ण ध्येयधोरण रूपरेषा समजावून सांगितली आणि येणाऱ्या 2024 च्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी हा पक्ष निवडणुका स्वबळावर लढवत असून तमाम कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. तसेच सर्वप्रथम बुथ बांधणी आपण केली पाहिजे. पंचायत समिती जिल्हा परिषद उमेदवारांची चाचणी करून योग्य उमेदवार गण आणि जिल्हा परिषद गटामध्ये देऊन त्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गटप्रमुख नियुक्ती करणे, अशा पद्धतीने वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागले पाहिजे. असे अध्यक्षीय भाषणामध्ये बाळू शिरतुरे हे म्हणाले.
या बैठकीला राहुल वाघ, अविनाश वाघ, करण तायडे, सागर सावळे, अमोल वाघ, अतुल वाघ, अर्जुन वाघ, गोविंदा लहासे, योगेश वाघ ,अविनाश सावळे ,किरण मेढे, सुधीर वाघ, देवेंद्र सुरवाडे, सूर्यभान बोदडे, किरण लहासे, महेश मशाने,अतुल वाघ, निखिल वाघ, वाय डी जाधव ,आदित्य वाघ ,राजू तायडे, सागर भालेराव, संदीप वाघ ,अमोल वाघ, इत्यादी कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते .या बैठकीचे सूत्रसंचालन अरविंद गाढे यांनी केले आभार राजू वाघ यांनी मानले .

No comments