Breaking News

शेतकऱ्यांने वाटले पेढे....

लोक बातमीदार न्युज नेटवर्क 
जळगाव प्रतिनिधी - दोन वर्षापासून नमो शेतकरी सन्मान योजनेचे काकळणे ता.चाळीसगाव येथील शेतकरी शेषराव तातू पाटील यांचे रखडलेले पैसे... एकाच दिवशी १६ हप्ते ( एकठोक रक्कम रुपये 34000 /-) बँक खात्यात वर्ग झाल्याने आनंद झाल्याने त्यांनी चाळीसगाव
तालुका कृषी कार्यालयात वाटले नंदनचे पेढे !!!!!!
सविस्तर वृत्त असे की , काकळणे ता.चाळीसगाव येथील शेतकरी शेषराव तातू पाटील यांचे बँक खाता व आधार सीडिंग मध्ये प्रॉब्लेम होता. तालुका कृषी कार्यालयातील डाटा ऑपरेटर मांगीलाल पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा करत हा प्रॉब्लेम दूर केला. यामुळे त्यांचे एकूण थकलेले 16 हप्ते , हे एकाचवेळी / एकाचदिवशी त्यांच्या बँक खात्यात रुपये 34000 आल्याने ; त्यांना आनंद झाला व त्यांनी तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना पेढे वाटले.

No comments